पारिभाषिक शब्द मराठी - पारिभाषिक म्हणजे काय?

Information world
0

पारिभाषिक शब्द मराठी -  पारिभाषिक म्हणजे काय?  


विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योग, कृषी, शिक्षण, प्रशासन, विधी, वाणिज्य, कला आणि संस्कृती इत्यादी क्षेत्रांशी  संबंधित संकल्पनांच्या प्रकटीकरणासाठी पारिभाषिक शब्दांचा वापर केला जातो. त्यांच्या वापरामुळे त्या-त्या क्षेत्रांमधील ज्ञानव्यवहार अधिक नेमका अणि सुस्पष्ट होतो. त्यादृष्टीने पारिभाषिक शब्दांना अनन्यसाधारण महत्त्व असते. याठिकाणी तुमच्या माहितीसाठी काही महत्त्वाचे पारिभाषिक शब्द दिले आहेत.


ज्ञानप्रसाराच्या विविध माध्यमांत आणि जीवन व्यवहारात सतत बदल होत असतात. साहजिकच त्या त्या ज्ञानक्षेत्रात वा व्यवहारात प्रचलित शब्दांहून वेगळे शब्द वापरले जातात. विशिष्ट ज्ञानक्षेत्रातील माहिती, संकल्पना  यांच्या प्रकटीकरणाला योग्य ठरतील असे शब्द वापरण्याची गरज असते. भाषिक व्यवहाराच्या या वेगळेपणातून  ज्ञानक्षेत्रांची वा व्यवहारांची परिभाषा सिद्ध होते. अशा परिभाषेतून शास्त्रभाषेचा व ज्ञानभाषेचा विकास होत असतो.  बदलते जीवनव्यवहार, वाढत्या गरजा आणि विस्तारणारी ज्ञानक्षेत्रे यांनुसार ‘पारिभाषिक संज्ञा’ निर्माण होतात.  पारिभाषिक पदनामांच्या वापरामुळे किंवा पारिभाषिक संज्ञांच्या वापरामुळे विचार, संकल्पना यांच्या प्रकटीकरणात विशिष्टता, निर्दोषता येते. 

पारिभाषिक संज्ञांचा मूळ उद्देश व्यवहारसापेक्ष भाषेचे उपयोजन हा आहे.  शिक्षण, विविध शास्त्रे, प्रशासन, आरोग्य, समाज, उद्योग, व्यापार, न्याय, आर्थिक व्यवहार, कला, संस्कृती  इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये आवश्यकतेनुसार पारिभाषिक संज्ञा उपयोगात आणल्या जातात. या संज्ञांमुळे ज्ञानव्यवहार  अधिक प्रभावी आणि सुस्पष्ट होतात. या दृष्टीने पारिभाषिक संज्ञांना अनन्यसाधारण महत्त्व असते.

100+ पारिभाषिक शब्द परिचय

 1. Abbreviation संक्षेप, संक्षिप्त रूप
 2. Abstract गोषवारा, सार
 3. Acceptance स्वीकृती
 4. Agreement करार
 5. Achievement संपादणूक, कामगिरी
 6. Administrator प्रशासक
 7. Affidavit प्रतिज्ञापत्र
 8. Agitation आंदोलन
 9. Approval मंजुरी, अनुमोदन

पारिभाषिक शब्द मराठी

 1. Archaeology पुरातत्त्वशास्त्र
 2. Audit लेखापरीक्षा
 3. Banquet मेजवानी
 4. Ballot Box मतपेटी
 5. Bond लिखितबंधपत्र
 6. Beneficiary लाभार्थी
 7. Boycott बहिष्कार
 8. Calligraphy अक्षररेखनकला
 9. Caption मथळा
 10. Cardiologist हृदयरोगतज्ज्ञ

पारिभाषिक शब्द मराठी 50

 1. Census जनगणना
 2. Chartered Accountant सनदी लेखापाल
 3. Chief Justice मुख्य न्यायाधीश
 4. Child welfare बालकल्याण
 5. Civil defence नागरी संरक्षण
 6. Civil law दिवाणी कायदा
 7. Classical अभिजात
 8. Compensation भरपाई
 9. Consent संमती
 10. Copyright प्रताधिकार

पारिभाषिक शब्द मराठी 50

 1. Council समिती, परिषद
 2. Custom duty सीमाशुल्क
 3. Dearness Allowance महागाई भत्ता
 4. Decoding नि:संकेतन
 5. Demography लोकसंख्याशास्त्र
 6. Deputation प्रतिनियुक्ती
 7. Delegation प्रतिनिधी मंडळ
 8. Diagnosis रोगनिदान
 9. Dictatorship हुकूमशाही
 10. Dietitian आहारतज्ज्ञ

पारिभाषिक शब्द व त्यांचे अर्थ

 1. Dispute वाद, तंटा
 2. Ecologist पर्यावरणतज्ज्ञ
 3. Etiquette शिष्टाचार
 4. Emergency आणीबाणी
 5. Excise Duty उत्पादनशुल्क
 6. Express Way द्रुतगती मार्ग
 7. Felicitation गौरव, सत्कार
 8. Financial Year वित्तीय वर्ष
 9. Forecast पूर्वानुमान
 10. Forestation वनीकरण

पारिभाषिक शब्द मराठी अर्थ

 1. Gift deed दान पत्र
 2. Government Resolution शासननिर्णय
 3. Gradation श्रेणी, प्रतवारी
 4. Habitat वसतिस्थान
 5. Honorary मानद
 6. Horticulture उद्यानविद्या, 
 7.  फलोत्पादन
 8. Hypothesis परिकल्पना, 
 9. गृहीतकृत्य
 10. Instructor निदेशक 

इंग्लिश शब्द मराठी अर्थ

 1. Intake capacity प्रवेशक्षमता
 2. Intelligence बुद्‌धिमत्ता
 3. Interpreter दुभाषक
 4. Intervention हस्तक्षेप
 5. Judgement न्यायनिर्णय
 6. Juvenile court बाल न्यायालय
 7. Letter of Guarantee हमीपत्र
 8. Layout मांडणी, आराखडा
 9. Liability दायित्व
 10. Linguistics भाषाशास्त्र

पारिभाषिक शब्द की आवश्यकता

 1. Magistrate दंडाधिकारी
 2. Mandate हुकूम/जनादेश
 3. Manual नियमपुस्तिका
 4. Manuscript हस्तलिखित
 5. Mechanics यंत्रशास्त्र
 6. Migration स्थलांतर
 7. Meteorology हवामानशास्त्र
 8. Millennium सहस्रक
 9. Mortgage गहाण
 10. Mass Communication जनसंप्रेषण

पारिभाषिक शब्द PDF in Marathi

 1. Motto ब्रीदवाक्य
 2. Nutrition पोषण
 3. Ordinance अध्यादेश, वटहुकूम
 4. Pedagogy अध्यापनशास्त्र
 5. Penalty दंड, शास्ती
 6. Personal Assistant स्वीय सहायक
 7. Preamble उद्देशिका
 8. Prevention प्रतिबंध
 9. Quality Control गुणवत्ता नियंत्रण
 10. Quorum गणपूर्ती

'पारिभाषिक शब्द'. मराठी Marathi meaning 

 1. Recommendation शिफारस
 2. Remote Sensing दूरसंवेदन, दूरस्थ
 3. Salient Feature ठळक मुद्दे, वैशिष्ट्ये
 4. Scrutiny परिनिरीक्षण, छाननी
 5. Souvenir स्मरणिका
 6. Stipend विद्यावेतन, 
 7.  शिष्यवृत्ती
 8. Registrar निबंधक
 9. Surveyor सर्वेक्षक
 10. Suspension निलंबन

पारिभाषिक शब्द मराठी -  पारिभाषिक म्हणजे काय?  

 1. Symposium परिसंवाद
 2. Treasurer कोषाध्यक्ष
 3. Unlawful बेकायदेशीर
 4. Vaccination लसीकरण
 5. Value Added Tax मूल्यवर्धित कर
 6. Veterinary पशुवैद्यक
 7. Veto नकाराधिकार
 8. Viva voce मौखिक परीक्षा
 9. Volunteer स्वयंसेवक
 10. Wage policy वेतन धोरण

पारिभाषिक शब्द मराठी 100

 1. Yield उत्पन्न
 2. Zero hour शून्य काल
 3. Calligraphy सुलेखन 
 4. Secretary सचिव, चिटणीस
 5. Academic Qualification शैक्षणिक अर्हता
 6. Children's Theatre बालरंगभूमी
 7. Action कार्यवाही/कृती
 8.  Comedy सुखात्मिका
 9. Census जनगणना 
 10. Agent अभिकर्ता/प्रतिनिधी

पारिभाषिक शब्द मराठी 10th

 1. Casual Leave नैमित्तिक रजा 
 2. Category प्रवर्ग
 3. Anniversary वर्धापनदिन
 4.  Bio-data स्व-परिचय
 5. Corporation महामंडळ, निगम 
 6. Bonafide Certificate वास्तविकता प्रमाणपत्र
 7. Daily Wages दैनिक वेतन, रोजंदारी 
 8. Book Stall पुस्तकविक्री केंद्र
 9. Lyric भावगीत 
 10. Dismiss बडतर्फ 

पारिभाषिक शब्द मराठी 12th

 1. Magazine मासिक-पत्रिका
 2.  Event घटना
 3. Medical Examination वैद्यकीय तपासणी 
 4. Exchange देवाण-घेवाण,
 5. Express Highway द्रुतगती महामार्ग विनिमय करणे
 6. News Agency वृत्तसंस्था 
 7. Official Record कार्यालयीन अभिलेख
 8. Exhibition प्रदर्शन 
 9. Orientation निदेशन, उद्बोधन
 10. General Meeting सर्वसाधारण सभा

पारिभाषिक शब्द मराठी 1000

 1.  Part Time अंशकालीन, अर्धवेळ
 2. Government Letter शासकीय पत्र
 3.  Goodwill सदिच्छा
 4. Programme कार्यक्रम 
 5. Handbill हस्तपत्रक
 6. Plumber नळ-कारागीर 
 7. Honorable माननीय
 8. Pocket Money हातखर्च 
 9. Humanism मानवतावाद
 10. Index अनुक्रमणिका

पारिभाषिक शब्द मराठी 10

 1.  Registered Letter नोंदणीकृत पत्र
 2. Junior Clerk कनिष्ठ लिपिक
 3.  Receptionist स्वागतिका
 4. Refreshment अल्पोपहार 
 5. Journalism वृत्तपत्रकारिता

 पारिभाषिक शब्द परिचय  -  पारिभाषिक म्हणजे काय?

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)