कथालेखन - उपयोजित लेखनप्रकारामध्ये ‘कथालेखन’ हा घटक विद्यार्थ्यांच्या सृजनशील लेखनाला वाव देणारा आहे.
कल्पना, नवनिर्मिती, स्वभाषेत प्रकटीकरण हे या वयोगटाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत. कथालेखनाच्या योग्य सरावाने
भावी कथालेखक घडू शकतील.
कथाबीजानुसार कथांचे विविध प्रकार पडतात.
कथालेखन उदा.,
(१) शौर्यकथा ,
(२) विज्ञान कथा ,
(३) बोधकथा ,
(४) ऐतिहासिक कथा ,
(५) रूपककथा ,
(६) विनोदीकथा इत्यादी.
कथालेखनाचे महत्त्वाचे घटक जाणून घेण्यासाठी खालील मुद्द्यांचा अभ्यास करून कथालेखन तंत्र जाणून घेऊया.
मराठी कथा लेखन कसे करावे
(१) कथाबीज-
कथालेखन ही कल्पकतेवर आधारलेली कला आहे. कथाबीज हा कथेचा प्राण असतो. कथालेखन करताना
कथाबीजाच्या विषयास अनुसरून दैनंदिन निरीक्षण, वाचन, अनुभव, सृजनशील कल्पना, तर्कसंगत विचार
यांचा विचार करून कथाबीज फुलवावे.
(२) कथेची रचना-
कथेला प्रारंभ, मध्य व शेवट असावा. कथेची सुरुवात आकर्षक असावी. वाक्यांची रचना पाल्हाळिक
नसावी. आकलनपूर्ण छोटी छोटी वाक्ये असावी. कथेचा मजकूर सातत्याने उत्कंठावर्धक असावा. कथेतील
आशयाला काहीतरी वळण असेल तर उत्कंठा अधिक वाढते. कथा नेहमी भूतकाळातच लिहावी.
खालील मुद्द्याचा सविस्तर विचार करूया.
३) कथेतील घटना व पात्रे-
कथाबीजानुसार कथेतील पात्रे व घटना निवडाव्यात. जे कथाबीजाला पुढे नेऊ शकतील. घटना घडण्याचे
स्थळ सुसंगत निवडावे. पात्र, घटना व स्थळांच्या वैशिष्ट्यांचे बारकावे जाणून घेऊन वर्णन करावे. वर्णन
चित्रदर्शी असावे.
(४) पात्रांचे स्वभाव विशेष-
कथेतील आशयाला समर्पक असे पात्रांच्या स्वभाव विशेषांचे व त्या अनुषंगिक वर्तनांचे वर्णन करावे.
उदा., राग आला तर- त्याने हाताच्या मुठी करकचून आवळल्या इत्यादी.
(५) कथेतील संवाद व भाषा-
कथेत निवडलेल्या परिसराला कथाबीजाला अनुसरून कथेची भाषा असावी. अालंकारिक भाषेचा वापर
करून कथेची परिणामकारकता वाढवता येते. विरामचिन्हांचा योग्य वापर करावा. संवादाची परिणामकारकता
विरामचिन्हांमुळे निर्माण होते. पात्रांच्या तोंडी पात्राच्या वैशिष्ट्यांच्या गरजेनुसार ग्रामीण भाषा व बोलीभाषा
यांचा वापर सहजतेने करायला हवा. कथेमध्ये वाक्प्रचार, म्हणी यांचा सुयोग्य वापर करावा.
(६) शीर्षक तात्पर्य-
संपूर्ण कथेचा आशय, कथेतील मूल्य/संदेश व्यक्त करणारे शीर्षक असावे. कथेतून मिळणारा संदेश/मूल्य
किंवा कथेतील वैशिष्ट्यपूर्ण आशय प्रतिबिंबित करणारे तात्पर्य असावे.
कथालेखन पूर्णत: सृजनशील कल्पकतेवर अपेक्षित आहे. कथाबीज विस्तारासाठी, अपूर्ण कथा पूर्ण
करण्यासाठी वेगळा नाविन्यपूर्ण विचार किंवा कल्पना अपेक्षित आहे.
विद्यार्थ्यांनो, तुमच्या सृजनशील कल्पनेला खूप घुमारे असतात. त्यांना फक्त निरीक्षण व कल्पकतेने
अभिव्यक्त करा.
कथालेखन मूल्यमापनाच्या नियोजित कृती
(१) कथाबीजावरून कथालेखन
(२) मुद्द्यांवरून कथालेखन
(३) दिलेल्या शब्दांवरून कथालेखन
(४) कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्धलिहिणे किंवा उत्तरार्ध देऊन पूर्वार्धलिहिणे.
चांगली कथा कशी लिहावी ?
"आजकाल काही लिहित का नाहीस रे ?" कूठल्यातरी वेगळ्याच विषयावर चर्चा चालु असताना गिरिजाने अचानकच हा प्रश्न विचारला .
" आजकाल काही लिहित का नाहीस रे ? आधी काही ना काहीतरी लिहित असायचास ? कशा का होईना वादग्रस्त का होइना गोष्टीबिष्टी लिहायचास ... आता एकदमच बंद केलेलं दिसतय ... लिहिना एखादी चांगली गोष्ट "
ह्या संवादावरुन डोक्यात विचार चक्र सुरु झाले . आधी सुचायचे ते जसे च्या तसे लिहुन काढायचो , पण आता ते चांगले होईल का ह्या विचाराने लिहायचे टाळतो . पण खरंच एखादी चांगली कथा कशी लिहावी
माझ्या मते कथेचे चार घटक असतात : मुद्द्यांच्या आधारे कथा लेखन मराठी
१) कथाबीज -
जो की कथेचा मुळ आत्मा . जे लेखकाला सांगायचंच . बहुतांशवेळा वन लायनर . कथेचे सार उदाहरणार्थ फाउंटनहेड मधे "Man's ego is the fountainhead of human progress" हे कथा बीज आहे.
२) पात्रं -
मग वरील विचार कन्व्हे करायला पात्रंची रचना करावी लागेल , त्या पात्रांचे वर्णन जितके सक्षम पणे येईल , तितके विचार सहज पणे मांडता येतील .
३) प्रसंग -
एकदा पात्रं उभारुन झाले की प्रसंग सिच्युअशन उभे करावे लागेल की ज्यातुन त्या पात्राचे कॅरॅक्टर दाखवता येईल
४)संवाद -
आणि सर्वात शेवटी पात्रांमधील संवाद जे की खर्या अर्थाने कथा पुढे सरकवणारे असतील .
पण हे सगळे प्रत्यक्षात उतरवताना बराच घोळ होतोय ... जरा पात्रांवर प्रसंगांवर जास्त लक्ष गेले तर फार रटाळ होते कथा आणि जर संवाद जास्त झाले तर एकांकिका टाईप होते .
मग ह्यात नक्की ताळमेळ कसा साधता येईल ?
हे मोठ्ठे मोठ्ठे प्रसिध्द लेखक कसे बरे विचार करत असतील , जी.एं च्या कथा वाचुन तर अजुनही आश्चर्य चकित व्ह्याय्ला होते मला , ४० -४० पानांच्व्ही कथा कशी बरे लिहित असतील ते ?
लघुकथा लिहिणे तर त्याहुन अवघड वाटते मला कारण तिथे शब्दांची मर्यादा आली , मोजक्या शब्दात , पात्रं , प्रसंग संवाद लिहुन कथाबीज वाचका पर्यंत पोहचवणे जास्त जास्त अवघड आहे मला वाटते .
बालकथा हा माझ्या वैयक्तिक आवाक्या बाहेरील प्रकार आहे हे मला नुकतेच उमगले आहे , लहान पोरांना काय आवडेल अन काय नाही ह्याचा नेम नाही
ह्या विषयावर मिपाकरांचे काय विचार आहेत ? मिपावर कथा लेखन करणारे कशी लिहितात कथा ?
कथालेखन लिहिताना खालील बाबी लक्षात ठेवून केले पाहिजे.
# 1 सर्वप्रथम, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की कथेमध्ये फारच लहान वाक्य किंवा अत्यंत विस्तृत, मोठे वाक्य नसावेत.कथा लिहिताना वेगवेगळ्या घटना आणि थीम्स समतोल मार्गाने लिहिल्या पाहिजेत.
# २. कथेचे शीर्षक नेहमीच आकर्षित केले पाहिजे जेणेकरून शीर्षक वाचल्यानंतर केवळ वाचकांना उत्साह आणि आनंद वाटेल.
# 3. कथेची भाषेची शैली वाचकांसाठी अगदी सोपी आणि अस्खलित असावी, अशी दीर्घ आणि कठीण वाक्ये कथा लेखनात वापरली जाऊ नयेत हे लेखकाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.
# 4. कथेचा शेवट इतका सुंदर आणि सुलभ असावा की वाचकाला शीर्षकाबद्दल काहीच प्रश्न नसावेत.
# 5. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कुठल्याही कथेत, हे असावं की वाचकास त्या कथेतून आणि कथा कथेतून व्यक्त होणा .्या घटनांमधून कुठल्याही प्रकारचा उपदेश मिळाला पाहिजे. त्याचा त्या घटनांशी संबंध असावा.
या सर्व बाबी लक्षात घेत कथा लेखन करणे खूप सोपे आहे. म्हणून कथा लिहिण्याची ही पद्धत लेखकास खालील मुद्द्यांनुसार योग्य भाषेची शैली वापरुन मनोरंजक, मनोरंजक आणि अमूर्त संपूर्ण कथा लेखन करण्याची एक अनोखी शैली प्राप्त करण्यास मदत करू शकते.
नक्की वाचा
मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा - matathi nibhand