लेखनकौशल्य - लेखन कौशल्य मराठी

Information world
0

लेखनकौशल्य लेखनाचे प्रकार -

  1. निबंध लेखन
  2. प्रसंगलेखन-
  3. आत्मकथन-
  4. कल्पना विस्तार -

निबंध लेखन

 निबंधलेखन म्हणजे विषयानुरूप केलेली विचारांची मुद्देसूद मांडणी होय. एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात येणारे विचार, भावना, कल्पना, 
स्वानुभव यांना प्रभावी भाषेत मुद्देसूदपणे मांडणे म्हणजे निबंधलेखन. निबंधलेखनात लिहिणाऱ्याच्या विचारांचे प्रतिबिंब 
पडत असते. लेखनकौशल्याचा विकास व अभिव्यक्तीक्षमतेचा विकास हे निबंधलेखन घटकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

निबंधलेखनासाठी आवश्यक गोष्टी/क्षमता
  1. प्रभावी भाषा चिकित्सक 
  2. विचार
  3. बहुश्रुतता
  4. वाचन 
  5. निरीक्षण 
  6. कल्पना
  7. भावना
  8.  चिंतन 
  9. शब्दसंपत्ती

कल्पकता, तर्कसंगती, विचाराची सुसंगत व सुसंबद्ध मांडणी ही लेखनकलेची काही वैशिष्ट्ये आहेत. आपण निबंध 
लिहितो म्हणजे विषयाच्या अनुषंगाने असलेले आपले वाचन, चिंतन, निरीक्षण, विचार व भावना यांना शब्दबद्ध करतो. 

आपले अनुभव मुद्देसूदपणे मांडतो. त्यासाठी प्रत्येक अनुभवाकडे संवेदनशीलतेने पाहता यायला हवे. आपल्या शब्दांतील 
अनुभव इतरांच्या मनाला भिडेल असा मांडता यायला हवा. शब्दांतून भाषासौंदर्य व्यक्त व्हायला हवे.
वाचन, आकलन, निरीक्षण, विचार, भावना, कल्पना व अनुभव यांची प्रभावी शब्दांत अभिव्यक्ती हा 
लेखनकौशल्य विकासाचा गाभा आहे. 

निबंधलेखनासाठी आवश्यक क्षमता, कौशल्ये, अभ्यास घटक हे सर्वच निबंधप्रकाराबाबत समान असले तरी प्रत्येक 
निबंध प्रकाराचे स्वत:चे वेगळेपण असते. निबंध प्रकार हाताळताना ती वैशिष्ट्ये लक्षात घेणे, ती अभ्यासणे, सुयोग्य
उपयोग करणे आवश्यक ठरते.

१) प्रसंगलेखन-

आपण अनुभवलेली, ऐकलेली, एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादा विचार, एखादी समस्या आपल्याला नेहमीच 
विचारप्रवृत्त करीत असतो. तो प्रसंग जर आपल्या बाबतीत घडला तर आपली प्रतिक्रिया काय असेल? असा विचार 
आपण केल्यास आपण प्रसंगाचे विश्लेषण आपण तटस्थपणे करू शकतो. अशा विचारांना, भावनांना, संवेदनशीलतेची, 

भावनिकतेची जोड देऊन शब्दबद्ध केले, तर तो प्रसंग वाचणाऱ्याच्या मनाला भिडतो त्या प्रसंगाचे शब्दचित्र डोळ्यांसमोर उभे राहू शकते. आपल्या भावना प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्यही व्यक्त होऊन लेखनकौशल्याचा, अभिव्यक्ती क्षमतेचा विकास साध्य होऊ शकतो.


प्रसंगलेखन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे :

(१) प्रसंगाची, घटनेची कल्पना
(२) सूक्ष्मनिरीक्षण
(३) भावनांची अभिव्यक्ती
(४) चित्रदर्शी संवेदनशील लेखन



(२) आत्मकथन-

आत्मलेखन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे : 
(१) सजीव आणि निर्जीव घटकांबाबत सर्वसमावेशक विचार. 
(२) त्यांच्या भावना, सुखदु:ख, सवयी, उपयोगिता, कार्य यांचा शोध निरीक्षणशक्तीने घेणे. 
(३) आपण स्वत: ती वस्तू आहोत अशी कल्पना करू. (परकाया प्रवेश)
(४) कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्णरितीने कल्पना मांडणे. 
(५) संपूर्ण लेखन करताना भाषा प्रथमपुरुषी एकवचनी असावी.

आत्मकथन नमुना
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्‌द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनपर लेखन करा.


(३) कल्पना विस्तार

 कल्पना विस्तार करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे
(१) कल्पनाप्रधान लेखनकौशल्याचा उद्देशच कल्पना करता येणे हा आहे. 
(२) मुख्य कल्पना निबंधाच्या शीर्षकातच दडलेली असते. 
(३) एकातून दुसरी कल्पना अशी कल्पनांची साखळी लेखनकौशल्य वाढवते. 
(४) कल्पना वास्तवाला धरून किंवा गमतीदार असावी.
(५) विषयासंबंधी सुचलेल्या कल्पनांचा विस्तार करावा.

UPSC: Writing Skill / लेखन कौशल्य


लेखनकौशल्याचे मानिी जीनातील :

 दैनंददन व्यिहािामध्ये काही गोष्टी आपल्या दीघलकाळ लक्षात िहाव्यात म्हिून आपि त्या णलहून ठेितो. लेखनामुळेआपल्या णिचािांना णिश्वासाहलतालाभते. आज माणहतीच्या युगात दूिणचत्रिािीच्या बातम्या पाहूनही अनेकजि सकाळी उठताच  आपला लेखनािि अणधक णिश्वास असतो. माणहती, ञानदीघलकाळ जपून ठेिण्यासाठी लेखन  ठिते. दैनंददन व्यिहाि आणि स्ियंममूल्यांकनात लेखन आहे. आपल्या मनातील णिचाि, भािना यांच्या अणभव्यिीसाठी लेखन कौशल्य उपयुि ठिते. आपल्या जीिनात उपयुि ठििाऱ्या या लेखन कौशल्याकडे णिद्याध्याांनी आजच्या परिणस्र्थतीत करिअि म्हिून पाहिेगिजेचे आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)