पत्रलेखन-आपल्या मनातील भावना, विचार, मते मुद्देसूदपणे, सुसंबद्ध पद्धतीने अपेक्षित व्यक्तीपर्यंत लिखित
स्वरूपात पोहोचवण्याचे उत्तम माध्यम म्हणजे पत्रलेखन होय.
यापूर्वीच्या इयत्तांमध्ये अनौपचारिक व औपचारिक पत्रलेखनाचे काही प्रकार तुम्ही अभ्यासले आहेत.
पत्रलेखन ही एक कला आहे ज्यात आपण आपल्या मनाची भावना शब्दांद्वारे व्यक्त करतो. कधीकधी असे होते जेव्हा आपण व्यक्तीस आपल्या मनात उद्भवलेल्या विचारांचे आणि भावना व्यक्त करू शकत नाही, तर आम्ही त्या भावना आणि विचारांना पत्राने सहजपणे व्यक्त करू शकतो.शब्दांद्वारे शब्दांद्वारे व्यक्त केलेले भाव नेहमी आपल्यासोबत असतात. हृदयाशी जोडण्यासाठी, माहितीचे देवाणघेवाण करणे, समाजात जागरुकता पसरविणे आणि प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
आपण जितके वारंवार आपल्याला हवे तितके अक्षरे वाचू आणि जितक्या वेळा शक्य तितके आनंद घेऊ.आजही, दूरसंचार क्रांतीमुळे मोबाईल डिव्हाइसेसमुळे तथापि, पत्रांचे महत्त्व कमी झाले नाही. आजही, घनिष्ठ संबंध जतन करण्यासाठी सरकारी आणि व्यवसायासाठी पत्र आवश्यक आहेत. म्हणूनच पत्र हे अभिव्यक्तीचे एक शक्तिशाली आणि सुलभ माध्यम आहे.
पत्र लेखन मराठी प्रकार -
* कृतिपत्रिकेत एखादी सूचना, आवाहन, निवेदन, जाहिरात इत्यादी प्रकारांपैकी एक कृती दिलेली असेल,
ती कृती समजून घेऊन तुम्हांला पत्रलेखन करायचे आहे.
पत्रलेखनाचा विषय (निवेदन), सूचना, जाहिरात, बातमी इत्यादींपैकी एक.
कृतीच्या आकलनावरून पत्रलेखन.कृतीतील सर्व मुद्दे लेखनात येणे आवश्यक.
पत्राच्या विषयानुरूप प्रभावी भाषाशैली.
- औपचारिक .
- (व्यावहारिक) .
- अनौपचारिक .
- (घरगुती, कौटुंबिक) .
- मायना व विषय .
- मुख्य मजकूर समारोप .
- विषयानुरूप मांडणी .
- ज्यांना पत्र पाठवायचे त्यांचा .
- पत्ता (लिफाफ्यासह) .
- पत्र पाठवणाऱ्याचा .
- पत्ता व दिनांक .
औपचारिक पत्रप्रारूपाचे प्रमुख घटक
स्वपरिचय, मागणी व तक्रार या औपचारिक पत्रप्रकारांचा यावर्षी आपण अभ्यास करणार आहोत.
पत्रलेखनाचे
औपचारिक पत्राची मांडणी
१. पत्राच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात पत्र लिहिणाऱ्याचे नाव, हुद्दा, पिनकोडसह पत्ता, दिनांक,
ई-पत्ताही असावा.
२. डावीकडे योग्य मायना लिहावा. संबंधित व्यक्तीचे नाव, हुद्दा, पत्ता लिहावा.
३. कृतीत विशेषनाम असेल तरच ते लिहावे. अन्यथा प्रति, प्रेषक याठिकाणी ‘अ. ब. क.’ असा उल्लेख
करावा.
४. औपचारिक पत्रात पत्राचा ‘विषय’ लिहिणे आवश्यक आहे.
५. महोदय/महोदया असे लिहून पत्रलेखनास सुरुवात करावी.
६. शेवटी योग्य ते संबोधन वापरून समारोप करावा.
संबंधित विषयासाठी स्व-परिचय पत्र तयार करा. अभिनव विद्यालय, लातूर. आंतरशालेय क्रीडास्पर्धा क्रीडास्पर्धेतील कबड्डी संघात प्रवेश मिळणेबाबत
क्रीडा विभाग प्रमुख स्वपरिचय पत्राचे मुद्दे
(१) संपूर्ण नाव (६) शैक्षणिक पात्रता
(२) पत्ता (७) इतर आवडणारे खेळ
(३) संपर्क क्रमांक (८) गतवर्षी प्राप्त केलेले यश
(४) जन्मतारीख
(५) उंची- वजन