मुलाखत लेखन - नमुना मराठी

Information world
0

मुलाखत लेखन नमुना

मुलाखत लेखन - विद्यार्थी मित्रांनो,खालील मुलाखत ही काल्पनिक असली, तरी त्यातील विषय व त्याचे गांभीर्य महत्त्वाचे आहे. व्यसनाधीनता 
हा सुदृढ व निकोप जीवनाला लागलेला शाप असतो. त्यापासून जाणीवपूर्णक अन्निर्धाराने दूर असलेल्या
व्यक्तींनाच सुखी व निरामय जीवनाचा सूर गवसतो. हा आनंदी जीवनाचा मंत्र जाणून घ्या व कोणत्याही लोभाला 
कधीच बळी पडू नका. स्वत:चे व पर्यायाने समाजाचे निकोप मनच राष्ट्रप्रगतीसाठी आवश्यक असत
नमस्कार! आज व्यसनमुक्ती दिन. त्या निमित्ताने सोनेगाव या गावात व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करणारे 
मानसरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश वाघ यांच्याशी संवाद साधायचा आहे. त्यांच्या ‘मुक्तानंद’ व्यसनमुक्ती केंद्राबाबत 
अधिक जाणून घेऊया. 

मुलाखत लेखन - नमुना

प्रश्न : सर नमस्कार, ‘मुक्तानंद’ हे केंद्र स्थापन करण्याची गरज का भासली?
उत्तर : अनेक पालक नेहमीच माझ्याकडे व्यसनमुक्तीबाबत सल्ला घेण्यास व मुलांवर उपचार करण्यास येत. 
त्यांची गरज व इच्छा ओळखून मी हे केंद्र स्थापन केले.
प्रश्न : डॉक्टर ही किशोरवयीन मुले व्यसनाधीनतेकडे का वळलीत? 
उत्तर : छान प्रश्न विचारला. व्यसनाधीन होण्याची कारणे बरीच आहेत. काही मुले अबोल, आत्मविश्वासाची 
कमतरता, शैक्षणिक अपयश, कौटुंबिक ताणतणाव, प्रेमभंग यांमुळे मानसिक नैराश्याच्या भावनेला बळी 
पडून त्यातून बाहेर पडण्यासाठी मित्रपरिवाराचा आधार घेतात. त्यात व्यसनाची उपलब्धता मिळाल्यास
त्याकडे आकर्षित होतात. 
प्रश्न : मुले एकदम व्यसनाधीन बनतात की सुरुवातीला दुसरे काही सेवन करतात?
उत्तर : खरंतर, सुरुवातीला गंमत व नंतर सवय म्हणून व्यसन केले जाते. या गोष्टी ‘स्लो पॉइझनिंग’ आहेत हे 
त्यांना कळत नाही.
प्रश्न : डाॅ. या मुलांमध्ये काही वेगळी अशी लक्षणे आढळतात का?
उत्तर : त्यांना झोप येत नाही, त्यांचे हात-पाय थरथरतात, त्यांना भीती वाटते, कायम अस्वस्थता जाणवत 
असते; पण ते स्वत:हून कबूल करत नाही. दीर्घसंवादानंतरच ती व्यसनाधीनता लक्षात येते. 
प्रश्न : व्यसनाधीनतेचे वैयक्तिक आणि सामाजिक दुष्परिणाम होतात का?
उत्तर : किशोरवयीन मुलांमधील व्यसनाधीनता त्यांच्यासाठी व समाजासाठीही घातक असते.
प्रश्न : डॉक्टर, या परिस्थितीत आपण कोणता सल्ला द्याल?
उत्तर : पालकांनी मुलांशी मोकळा संवाद साधावा. विचार, मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असावे. घरातील 
वातावरण सुसंवादी व मैत्रीपूर्ण असावे. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे याची सर्वांनीच जाण 

मुलाखत लेखन - नमुना मराठी

मुलाखतीचे महत्व

  1. मुलाखतीमध्ये यश मिळवण्यासाठी तंत्र
  2. स्वतःबद्दल सांगण्याची तयारी आरशासमोर करा. हे वारंवार करून त्यात नैसर्गिकता आणा
  3. हसरा चेहरा महत्त्वाचा असतो. चेहऱ्यावर प्रसन्नता असू द्या. हसऱ्या चेहऱ्याची सवय करा.
  4. योग्य व्यावसायीक पेहराव तुम्हाला उठाव देणारा असावा. योग्य कोट व टाय असल्यास चांगले परिणाम साधले जातात. काळी विजार व पांढरा शर्ट असल्यास उत्तम अथवा निळसर, करडे कपडे चालतात.
  5. ही मुलाखत माझ्यासाठीच आहे आणि मी त्यात यशस्वी होणारच आहे असाच विचार करा.
  6. मुलाखतीच्या ठिकाणी जाणवणाऱ्या गंभीर वातावरणामुळे भांबावून जाऊ नका. आपण निवांत राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी संथ श्वसन करा ताण कमी होईल.
  7. तुमच्या अवगत कौशल्यांबाबत सांगताना उत्साहाने त्यामध्ये केलेले कार्य सांगा. उदाहरणे द्या.
  8. मुलाखतीत असत्य कधीही बोलू नका.
  9. मुलाखतीत घाई गडबड न करता शांत चित्ताने प्रश्नांची उत्तरे द्या.
  10. प्रश्न न समजल्यास विनयाने परत विचारा, यात काही चुकीचे नाही.
  11. मुलाखतकर्त्याच्या अपेक्षांची जास्तीत जास्त पूर्तता करता येईल याची काळजी घ्या.
  12. मुलाखती नंतर विनम्रतेने आभार माना

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)