समास व त्याचे प्रकार -Marathi Grammar

Information world
0

समास व त्याचे प्रकार 

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण समाज आणि समासाचे प्रकार या विषयी माहिती घेणार आहोत हा विषय मराठी व्याकरण मधील अत्यंत महत्वाचा असा विषय आहेत समाज आणि त्याचे प्रकार यावर तुम्हाला परीक्षेसाठी एक किंवा दोन प्रश्न नक्की असतील त्यासाठी या घटकाचा अभ्यास करणं ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहेत म्हणून आम्ही तुमच्यासाठी समाज आणि समासाचे प्रकार काय असतात यावर सविस्तर विश्लेषण या पोस्टमध्ये घेऊन आलो आहेत ही पोस्ट तुम्ही लक्षपूर्वक वाचा आणि तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर पाहूया समाज आणि समासाचे प्रकार मराठी व्याकरण

समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात.

  • 1. अव्ययीभाव समास
  • 2. तत्पुरुष समास
  • 3. व्दंव्द समास
  • 4. बहुव्रीही समास

 1)  अव्ययीभाव समास :

ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात. अव्ययीभाव समासात आपल्याला खालील भाषेतील उदाहरणे पहावयास मिळतात. 

2 ) तत्पुरुष समास :
ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

 3) व्दंव्द समास :

ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात. त्यास व्दंव्द समास’ असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.

4) बहुव्रीही समास :
ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.

खालील वाक्ये वाचून त्यातील अधोरेखित शब्दांची वैशिष्ट्ये लक्षात घ्या.


(१) सैनिक सीमेवर पहारा करताना प्रतिक्षण सतर्क असतात.
(२) त्याने आपले तन मन धन राष्ट्रार्पण केले.
(३) सद्सद्‌विवेकबुद्धी असणारी व्यक्ती योग्यायोग्यतेचा विचार करतेच.
(४) लंबोदराला मोदक प्रिय आहेत.

अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.

(अ) प्रतिक्षण -...............
(आ) राष्ट्रार्पण- ..............
(इ) योग्यायोग्य-..............
(ई) लंबोदर-.................

वरील उदाहरणांवरून असे लक्षात येते, की वरील प्रत्येक शब्दात दोन वेगळे शब्द आहेत. बोलताना आपण त्या
दोन शब्दांशी संबंधित विभक्ती प्रत्यय, तसेच इतर शब्द गाळून वरीलप्रमाणे एक शब्द तयार करतो. उदा., ‘प्रतिक्षण’ 
हा शब्द प्रत्येक क्षणाला या दोन शब्दांसाठी वापरतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला ‘समास’ असे म्हणतात. अशा 
प्रकारच्या एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्याला ‘सामासिक शब्द’ म्हणतात. सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून 
तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून दाखवतो. या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला 
‘सामासिक शब्दाचा विग्रह’ असे म्हणतात.

(१) अव्ययीभाव समास-(समास व त्याचे प्रकार - मराठी व्याकरण )

 खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

(१) वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही.
(२) नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली.
(३) रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात.

तुम्ही अधोरेखित केलेल्या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये म्हणजे- अधोरेखित केलेल्या शब्दांत-

अव्ययीभाव समास मराठी उदाहरणे

(१) सामासिक शब्दातील दोन पदांपैकी पहिले पद प्रधान (महत्त्वाचे) असून ते बहुधा अव्यय आहे. 
उदा., गैर, यथा (आ, यथा, प्रति वगैरे उपसर्गांना संस्कृतमध्ये अव्यय म्हणतात.)

(२) संपूर्ण सामासिक शब्द वाक्यात क्रियाविशेषणाचे काम करतो.
 
(३) ‘पावलोपावली’ या शब्दात अव्यय दिसत नसले, तरी त्याचा विग्रह अव्ययासह केला जातो. म्हणून या 
शब्दाचा समावेश ‘अव्ययीभाव’ समासात होतो.

उदा., पावलोपावली-प्रत्येक पावलावर
यावरून असे लक्षात येते, की जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असते व या 
सामासिक शब्दाचा वापर वाक्यात क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा ‘अव्ययीभाव समास’ होतो
या सामासालाच प्रथमपदप्रधान समास असे म्हणतात. जेंव्हा समासातील पहिले पद बहुधा महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेंव्हा अव्ययीभाव समास होतो.   

अव्ययीभाव समास मराठी उदाहरणे

उदाहरणार्थ  
१. आजन्म - जन्मापासून
२. यथाशक्ती - शक्तीप्रमाणे
३. प्रतिदिन - प्रत्येक दिवशी 
४. प्रतिक्षण - प्रत्येक क्षणाला  

अव्ययीभाव या समासाची आणखी उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.  
दररोज, हरहमेश, बिनधोक, बेलाशक, गैरशिस्त, बरहुकूम, दरमजल, बिनशर्त, बेमालुम, गैरहजर, गावोगाव, जागोजाग, गल्लोगल्ली, पदोपदी, घरोघर, दारोदार, रस्तोरस्ती, दिवसेंदिवस, पावलोपावली इत्यादी.    

तत्पुरुष समास

ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तीप्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.     
ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेल्या शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात.    
थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. 
         

 तत्पुरुष समास उदाहरण मराठी

१. महामानव - महान असलेला मानव
२. राजपुत्र - राजाचा पुत्र
३. तोंडपाठ - तोंडाने पाठ
४. गायरान - गाईसाठी रान
५. वनभोजन - वनातील भोजन             

वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात  
तत्पुरुष समासातील दोन्ही पदे कधी कधी विग्रहाच्या वेळी एकाच विभक्तीत असतात यास सामानाधीकरण तत्पुरुष समास असे म्हणतात. 
    
उदाहरणार्थ     
काळमांजर - काळे असे मांजर       
तत्पुरुष समासातील दोन्ही पदे भिन्न अशा विभक्तीत असतात यास व्याधीकरण तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदाहरणार्थ
देवपूजा - देवाची पूजा

(२) तत्पुरुष समास-(समास व त्याचे प्रकार - मराठी व्याकरण )

खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

(१) मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला.
(२) सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले.
(३) शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्शत्रिकोण असतो. 

तुम्ही अधोरेखित केलेल्या लोकार्पण, सुप्रभाती, नीलकमल व त्रिकोण या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये
म्हणजे-

(१) या सामासिक शब्दात दुसरे पद महत्त्वाचे अाहे.
(२) सामासिक शब्दाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय योजावे 
लागतात.

यावरून असे लक्षात येते, की ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द
किंवा विभक्तीप्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. त्यास ‘तत्पुरुष समास’ असे म्हणतात.

तत्पुरुष समासाच्या तीन उपप्रकारा अभ्यास करूया.

(अ) विभक्ती तत्पुरुष समास (समास व त्याचे प्रकार - मराठी व्याकरण )

 पुढील उदाहरणांचा अभ्यास करून तक्ता पूर्ण करा.

लक्षात ठेवा- सामासिक शब्दांचा विग्रह करताना नामांना विभक्ती प्रत्ययांऐवजी काही काही वेळा काही 
शब्दयोगी अव्यये वापरली जातात. ती अव्यये त्या त्या विभक्तीचे कार्य करतात. उदा., चतुर्थी- करिता, प्रीत्यर्थ, 
साठी, पंचमी-पासून, पेक्षा.

विभक्ती तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये-

(१) सामासिक शब्दातील पहिले पद नाम किंवा विशेषण असते.
(२) सामासिक शब्दाचा विग्रह करताना पहिल्या पदाला प्रथमा व संबोधन सोडून अन्य विभक्तीचे प्रत्यय 

किंवा त्याच अर्थाची शब्दयोगी अव्यये वापरली जातात. ज्या तत्पुरुष समासात कोणत्यातरी विभक्ती
प्रत्ययाचा किंवा त्या विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे 
जोडली जातात त्यास ‘विभक्ती तत्पुरुष समास’ म्हणतात.

(आ) कर्मधारय समास- (समास व त्याचे प्रकार - मराठी व्याकरण )

 पुढील वाक्ये अभ्यासून तक्ता पूर्ण करा.

(१) गुप्तहेर वेशांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात.
(२) अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला.
(३) काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात.
(४) निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन.

कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये म्हणजे-

(१) दोन्ही पदे एकाच विभक्तीत (प्रथमा) असतात. उदा., मुखचंद्रमा
(२) कधी पूर्व पद (पहिले पद) विशेषण असते. उदा., कृष्णविवर
(३) कधी उत्तर पद (दुसरे पद) विशेषण असते. उदा., घननीळ
(४) कधी दोन्ही पदे विशेषणे असतात. उदा., श्यामसुंदर
(५) कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते. उदा., कमलनयन, नरसिंह
(६) कधी दोन्ही पदे एकरूप असतात. उदा., विद्याधन

ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे सामान्यत: प्रथमा विभक्तीत असतात त्या समासाला 
‘कर्मधारय समास’ असे म्हणतात.

(इ) द्विगू समास- (समास व त्याचे प्रकार - मराठी व्याकरण )

खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता पूर्ण करा.

(१) सूर्याच्या सोनेरी किरणांनी दशदिशा उजळून निघाल्यात.
(२) नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात.
(३) सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त 
झाला.

द्विगू समासाची वैशिष्ट्ये म्हणजे- (समास व त्याचे प्रकार - मराठी व्याकरण )

(१) द्‌विगू समासात पूर्वपद संख्याविशेषण असते.
(२) हा समास नेहमी एकवचनात असतो, कारण त्यातील सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध 
होतो.

ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा 
बोध होतो, तेव्हा त्यास ‘द्विगू समास’ असे म्हणतात

(३) द्वंद्व समास- (समास व त्याचे प्रकार - मराठी व्याकरण )

खालील उदाहरणांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

(१) पतिपत्नी ही संसाररथाची दोन महत्त्वाची चाके आहेत.
(२) योग्य पुरावा उपलब्ध झाला, की खरेखोटे कळतेच.
(३) स्नेहमेळाव्यात मित्रमैत्रिणींच्या गप्पागोष्टी रंगात आल्या.

यावरून असे लक्षात येते, की ज्या समासाची दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात 
त्याला ‘द्वंद्व समास’ असे म्हणतात.

सामासिक शब्दाचा विग्रह करण्याच्या पद्धतीवरून या समासाचे तीन प्रकार पडतात.

  1.  इतरेतर द्वंद्व समास
  2.  वैकल्पिक द्वंद्व समास
  3. समाहार द्वंद्व समास
(अ) इतरेतर द्वंद्व समास 

(समास व त्याचे प्रकार - मराठी व्याकरण )

 वैशिष्ट्ये
(१) अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा
असते.
(२) या समासाचा विग्रह करताना  आणि’,   ‘व’ यांपैकी एक  समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय वापरावे लागते. 
उदा., विटीदांडू-विटी आणि दांडू

(अा) वैकल्पिक द्वंद्व समास
 वैशिष्ट्ये
(१) दोन्ही प्रधान पदांपैकी 
एकाचीच अपेक्षा असते.
(२) समासाचा विग्रह करताना  ‘किंवा’, ‘अथवा’, ‘वा’ यांपैकी एक विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरावे लागते. 
उदा., खरेखोटे- खरे किंवा  खोटे

(इ) समाहार द्वंद्व समास 

(समास व त्याचे प्रकार - मराठी व्याकरण )

 वैशिष्ट्ये
(१) समासातील पदांचा विग्रह  करताना त्यातील मूळ पदांच्या बरोबर त्याच जातीच्या इतर  पदार्थांचा, वस्तूंचा समावेश  केलेला असतो.
(२) समासात आलेल्या आणि त्याच  जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला महत्त्व असते, म्हणून  हा समास एकवचनी असतो.
उदा., अंथरूणपांघरूण- अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी  लागणाऱ्या वस्तूव इतर वस्तू

(४) बहुव्रीही समास-
खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा.
(१) कृष्णा हा माझा सहाध्यायी आहे.
(२) काल रात्री आमच्या परिसरात नीरव शांतता होती.
(३) रावणाला दशमुख असेही संबोधले जाते.

हुव्रीही समासाची वैशिष्ट्ये म्हणजे- (समास व त्याचे प्रकार - मराठी व्याकरण )

(१) दोन्हीही पदे महत्त्वाची नसून या दोन्ही पदांशिवाय तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो.
(२) हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो.
(३) या सामासिक शब्दाचा विग्रह करताना गाळलेली पदे योजावी लागतात.

उदा., (१) निष्कलंक- नाही कलंक ज्याला अशी ती. (व्यक्ती)
(२) नीलकंठ- निळा आहे कंठ ज्याचा असा तो. (शंकर)

ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो 
व दिलेला सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते तेव्हा ‘बहुव्रीही समास’ होतो.


•पुढील वाक्ये वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष दद्या :

(1) प्रत्येकाने प्रतिक्षण सतर्क असावे.
(२) स्वातंत्र्यवीरांनी आपले तन-मन राष्ट्रार्पण केले.
(३) सज्जन माणूस योग्यायोग्यतेचा निवाडा करतो.
(४) लंबोदर विदयेची देवता आहे.

• कृती - अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा :

(१) प्रतिक्षण - प्रति - क्षण
(२) राष्ट्रार्पण -  राष्ट्र - अर्पण
(३) योग्यायोग्य -योग्य - अयोग्य
(४) लंबोदर - लांब - उदर

(१) प्रतिक्षण → प्रति (प्रत्येक) व क्षण या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.
(२) राष्ट्रार्पण → राष्ट्र व अर्पण या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.
(३) योग्यायोग्य  → योग्य व अयोग्य या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.
(४) लंबोदर → लंब व उदर या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.

समास व समासाचे प्रकार - मराठी व्याकरण


• वरील प्रत्येकी दोन शब्दांतील मधले काही शब्द व विभक्ती प्रत्यय गाळून जोडशब्द तयार केले आहेत.  कमीत कमी दोन शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात.
एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो, त्याला सामासिक शब्द म्हणतात आणि तयार झालेला सामासिक शब्द फोड करून सांगण्याच्या प्रक्रियेला समासाचा विग्रह असे म्हणतात. 

सामासिक शब्द विग्रह
(१) प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला
(३) योग्यायोग्य योग्य किंवा अयोग्य
(४) लंबोदर  लंब आहे उदर (पोट) असा तो

• समासात कमीत कमी दोन शब्द असतात. समासातील शब्दांना पद म्हणतात. पहिला शब्द म्हणजे पहिले पद. दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद. समासातील कोणते पद महत्त्वाचे किंवा प्रधान आहे, यावरून mसमासाचे प्रकार ठरतात. 

महत्त्वाचे पद म्हणजे प्रधान पद (+)
कमी महत्त्वाचे पद म्हणजे गौण पद (-)
पहिले पद दुसरे पद समासाचा प्रकार

(१) प्रधान गौण अव्ययीभाव समास (+-) (प्रतिक्षण)
(२) गौण प्रधान (-+) (राष्ट्रार्पण)
(३) प्रधान प्रधान वंद्व समास (++) (योग्यायोग्य)
(४) गौण गौण बहुव्रीही समास (--) (लंबोदर)

१ अव्ययीभाव समास

* • कृती - पुढील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा:

(१) वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही.
(२) नागरिकांनी गरजू विदयार्थ्यांना यथाशक्ती मदत केली.
(३) रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात.

वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द हे सामासिक शब्द आहेत.
सामासिकशब्द 
(१) गैरहजर 
(२) यथाशक्ती 
(२) पावलोपावली.

• या सामासिक शब्दांतील पहिले पद हे महत्त्वाचे आहे व संपूर्ण शब्द वाक्यात क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो. ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असते व जो सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो, त्या समासाला अव्ययीभाव समास म्हणतात.

आ, प्रति, यथा इत्यादी संस्कृत उपसर्ग आणि दर, बिन, ने यांसारखे फारशी उपसर्ग यांच्या साहाय्याने अव्ययीभाव समासातले सामासिक शब्द तयार होतात. तसेच, काही मराठी शब्दांची द्विरुक्ती होऊनही काही सामासिक शब्द तयार होतात. उदा., पुढील शब्द पाहा.

२ तत्पुरुष समास

• कृती - पुढील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा:
(१) मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला.
(२) सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले.
(३) शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विदयार्थी हा आदर्श त्रिकोण असतो.

वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द हे सामासिक शब्द आहेत.
सामासिक शब्द → 
(१) लोकार्पण 
(२) नीलकमल
(३) त्रिकोण.

 या सामासिक शब्दांतील दुसरे पद हे महत्त्वाचे आहे. ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तिप्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्यास तत्पुरुष समास म्हणतात. म्हणून,

तत्पुरुष समासाच्या तीन उपप्रकारांचा अभ्यास करू या :
(१) विभक्ती तत्पुरुष 
(२) कर्मधारय 
(३) द्विगू.

(१) विभक्ती तत्पुरुष :

 विभक्ती तत्पुरुष समासातील सामासिक शब्दात विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय गाळलेले असते.
उदा., 
१) क्रीडेसाठी अंगण
(२) विदयेचे आलय
→ विद्यालय
वरील पहिल्या उदाहरणात 'साठी' हे शब्दयोगी अव्यय तर
दुसऱ्या उदाहरणात 'चे' हा विभक्तिप्रत्यय गाळला आहे.
→ क्रीडांगण

मित्रांनो तुम्हाला  समास व त्याचे प्रकार ही पोस्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे माहिती लागत असेल तर कमेंटमध्ये कळवा आम्ही तुमच्यासाठी ती माहिती लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू

अव्ययीभाव समास उदाहरणइतरेतर द्वंद्व समास उदाहरण मराठी

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)