बोलीभाषांचा परिचय
बोलीभाषांचा परिचय -आधुनिक काळातील भाषेच्या अभ्यासाचा बोलीभाषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्वागतशील.
‘दर बारा कोसांवर भाषा बदलते’, या उक्तीनुसार वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या बोलींचा कमी-अधिक
प्रभाव असतो.
बोलीभाषांचा परिचय -‘एखाद्या विशिष्ट लोकसमुदायातील किंवा भौगोलिक प्रदेशातील व्यक्तींच्या अंगवळणी पडलेले आणि
त्यामुळे प्राय: मुद्दाम शिकावे न लागणारे व विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी सहजगत्या उपयोगी पडणारे
ध्वनिरूप साधन म्हणजे बोली.’ प्रसिद्ध ध्वनिशास्त्रज्ञ ना. गो. कालेलकर यांनी केलेली बोलीभाषेची ही व्याख्या.
समृद्ध भाषेचा संस्कृतिक ठेवा
- म्हणी
- शब्दसंग्रह
- सहज भाषेचा आविष्कार
- बोलीभाषेचे
- पैलू
- बोलीभाषेची उपयुक्तता
- परिसरानुसार बोलीभाषेचे प्राबल्य
- भाषासमृद्धी
* आपण प्रातिनििधक स्वरूपात पावरी व कातकरी या बोलीभाषांचा परिचय व्हावा
म्हणून त्यातील गद्यउतारे व त्यांचे प्रमाणभाषेत रूपांतर समाविष्ट केले आहेत. विद्यार्थ्यांनी या बोलीभाषेतील
उताऱ्यांच्या अभ्यासाबरोबर आपल्या परिसरातील बोलीभाषांचा अभ्यास करावा, त्यातून भाषिक समृद्धी व
साहित्याचा परिचय असा दुहेरी आनंद मिळवावा.
पावरी बोली
हांजपल्ली टाईम. आश्रम शालान्पटांगणम्पुऱ्या खेलता ओता. राजेश नावान्पुर्यो एखलूज्झेंडान्खांबह्
लागीन बठलू ओतो. तेरी आई हाते खतायलू ओतू. तेरू बाबू, आप्पूदिहूँ आश्रम शालाम मेकीन आवलू ओतू.
पाचवीन्वर्गाम्तेरं नाव आपलं ओतं. तिन्हा आवनू नि ओतो शू आयहि विचार करीन कयतू ओतू, ‘‘आई,
बाबाहो नाहा करीन कय... तोहों सोडीन मेहे शिकनेहे नि जाणू चेतहो.’’
आई मुंडोपर, डिलोपर आथ फिरविन
कयली, ‘‘बेटा, तोंहो खुप मोटू अयनू चेतहं. तु खुप मोटुसायेब व्हवनू जूवे यं आयहीन्हिवणं चेतहं... बेटा.
आईन्हिवणं पुरं नि कन्यूके? हवं के... अन्तू खुप शिकनू पंडहे. तिन्हानं करता थोडा दिहं आई दखू सेटू सेहे? नि
बेटा, मी कायम तोहं हातेज सेहे. आईन्-बेटान्इन्द्र नात्र गारा-पानीअहाल रयतलं. इनू दुय्यहं केदिहि अलग
अयतलं देखलं के? नि ने..... राजेश अगल कयत्लू,
‘‘आई मे हे रूटू कुण कुहनिन्खावाड हे? मेहे हुवणीखेर
कुण थापडीन हुवाडहे? मारं वगे कुण रयहे? मेहे पेटोहाते कुण लागाड हे’’ खुप विचार करीन पुसतु. आई आहती
कयलं, ‘‘पुऱ्या शिकीन खूप मोटू अयणेन्करता तोहज्मोटू अयणू पडहे. आईन्आंगल सुडीन रयणू पडहे. सोतान्
पायपर उबं रयणू पडहे...’’ ‘‘पुण आई मी एखलू केहेकं रयहि?’’ राजेश कयत्लू. ‘‘तू एखलू काहरी शेऽ बेटा?
देड-दुर्दहव तारा भाई तोहं हाते अहते...उठते...जा खेलणेह...’’ राजेश हाते वर्गामार्दन संतोषह खेलणेहे हाततू
ओतू. राजेशह तेरी चुक मोन्दु पौडी अती. डुला नुसला... ने उठतु उठतु पुऱ्या हाते खेलणेहे गायब अय गयलू.
संध्याकाळची वेळ. आश्रम शाळेच्या पटांगणात मुले खेळत होती. राजेश मात्र झेंड्याच्या खांबाला टेकून
एकटाच बसला होता. त्याच्या आईवर रागावला होता.
त्याचे वडील, अाप्पानी आज दुपारीच आश्रमशाळेत
पोहोचवलं. पाचवीच्या वर्गात त्याचं नाव घातलं. त्याला यायचं नव्हतं. तो आईला विनवून म्हणाला,
‘‘आई... अाप्पाला नको म्हणून सांग ना... तुला सोडून मला नाही जायचं शिकायला...’’ आईने त्याच्या
पाठीवरून डोळ्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली, ‘‘बाळ, तुला खूप मोठ्ठं व्हायचं आहे. तू खूप मोठ्ठा
साहेब व्हावा, हे आईचं स्वप्नं आहे... बाळ, आईचं स्वप्न पूर्ण नाही करणार? हो ना.. मग त्यासाठी खूप
शिकावं लागेल. त्यासाठी आईपासून थोडे दिवस दूर जावं लागेल. तुला काय वाटतं? मी तुझ्यापासून दूर
आहे? नाही बाळ, मी सदैव तुझ्याजवळच आहे. माय-लेकरू यांचं नातं चिखल-पाण्यासारखं असतं या
दोघांना कधी वेगळं झालेलं पाहिलं आहे? नाही ना.
.’’ राजेश पुढे म्हणाला, आई मला भाकर चुरून कोण
खाऊ घालणार? मला झोपतांना कोण थोपटणार? माझी बाजू कोण घेणार? मला पोटाशी कोण धरणार?’’
अनेक प्रश्नविचारले. आई हसत म्हणाली, ‘‘बाळ, शिकून मोठं होण्यासाठी आताच तुला मोठं व्हावं लागेल.
आईचं बोट सोडून जगावं लागेल, स्वावलंबी व्हावं लागेल...’’ ‘‘पण आई मी एकटा-कसा राहू?’’ ‘‘तू
एकटा कुठे आहेस बाळ तुझे दीड-दोनशे भाऊ तुझ्या सोबत असतील... उठं बरं...जा खेळायला...’’
राजेशच्या वर्गातला संतोष त्याला खेळायला बोलवत होता. राजेशला त्याची चूक लक्षात आली. डोळे पुसले
आणि उड्या मारत खेळणाऱ्या मुलांमध्ये गायब झाला.
- संजीव गिरासे.
कातकरी बोली
भुकणे मरूणा ये दिवस नाग्याना सहन करहताहात. पण त्यावर उपाय भेटता नाही. काम करूनी तयारी
असून काम नाही. भुकने दिवस काढुला लागत. पहिला लढा नंतरने आर्थिक मंदिना ते पारतंत्र दिवस
ब्रिटीसाहने सत्तेना, नाहि मार्गदर्शन, नाहि हितचिंतक ये परिस्थितीत कण्या देवधर्मनी कना उपास तपास,
शाळेना तर नाव नाही. गावातल्या साठी शाळा, गाववाल्यासाठी देवला आपण फक्त त्याहने साठी ढोराने
सारखी काम करायचा भेटना ती खायचा, नायतन आर्घेच भुकवर निजी जायचाये पण दिवस जातील, चांगला
दिवस येतील देवलातले मिटिंगीत आखलेले पुढाऱ्याही शब्द त्याला आठवतात. ‘‘चाला उठा जागा हया!’’
भुकेने मरणे हे दिवस नाग्याला सहन होत नव्हते;
पण त्यावर उपाय सुचत नव्हता. काम करण्याची
तयारी असून, काम नाही. भुकेले राहून दिवस काढावे लागत होते. पहिले युद्ध, नंतर आर्थिक मंदी त्यात
पारतंत्र्याचे दिवस ब्रिटिशांच्या सत्तेचे मार्गदर्शन नाही, कोणी हितचिंतक नाही. या परिस्थितीत कसले
देवधर्मनी कसले उपास तापास शाळेचे तर नावच नाही. गावातल्यांसाठी शाळा. गाववाल्यांसाठी मंदिर.
आपण फक्त त्यांच्यासाठी जनावरासारखे काम करायचे, मिळेल ते खायचे, नाहीतर अर्धपोटी झोपी जायचे.
हे पण दिवस जातील. चांगले दिवस येतील. देवळातील सभेमध्येपुढाऱ्यांनी काढलेले शब्द त्याला आठवत
होते. ‘चला ऊठा जागे व्हा!’
- अनिल वाघमारे.