शब्दार्थ मराठी - (अर्थ ,शब्दकोश )

Information world
0

100 + शब्दार्थ मराठी अर्थ

शब्दार्थ मराठी - शब्दांचा अर्थ केवळ वाक्यांमधे वापरुन समजू शकतो. येथे वाक्यांसह काही शब्द आणि त्यांचे अर्थ दिले आहेत.
 1. एकमुखाने - एका सुरात.
 2.  शिरी - डोक्यावर.
 3.  जागवणे - जागृत करणे.
 4.  रणांगण - युद्धभूमी. 
 5. अलबत - नक्कीच. 
 6. करंटे - दुर्दैवी. 
 7. अापत्काळी - संकटकाळी. 
 8. सक्रिय - क्रियाशील. 
 9. सणंग - विणलेले अखंड वस्त्र.
 10.  यच्चयावत - सगळे, सर्व. 
 11. कंबर कसणे - काम करायला तयार होणे. 
 12. शब्दांकित करणे - शब्दांत व्यक्त करणे. 
 13. लाखाच्या...कोटीच्या गप्पा
 14. पासपोर्ट - पारपत्र.
 15.  येरझारा घालणे - ये-जा करणे.
 16.  व्हिसा - परदेशात जाण्यासाठी परवानगीचा शिक्का असलेले पत्र. 
 17. बॅरिस्टर - वकील. 
 18. कोट्यधीपती - करोडपती. 
 19. हरी हरी करत बसणे-काही काम न करता नुसते बसून राहणे.
 20.  रिहर्सल - सराव.

 मराठी शब्दार्थ दाखवा 

 1.  क्रांती - मोठा बदल. 
 2. प्रभा - तेज. 
 3. झणि - त्वरित. 
 4. अमरत्वाची फुले - कायम टिकणारी फुले. 
 5. डालून ठेवणे - झाकून ठेवणे. 
 6. कुर्रेबाज- ऐटबाज. 
 7. कंठ फुटणे - आवाज उमटणे. 
 8. कोलाहल - गोंधळ. 
 9. खुमारी -लज्जत.
 10.  कानात प्राण आणून ऐकणे  -  लक्षपूर्वक ऐकणे. 
 11. साजिरा - सुंदर.
 12.  कलागत - कारागिरी.
 13.  पहाळी - पावसाची सर.
 14.  खेळगा - खेळगडी.
 15. वलानी - कपडे वाळत घालायची दोरी. 
 16. बाळवती - बाळाचे 
 17. अंथरूण-पांघरूण, दुपटे.
 18.  निर्धारित करणे - निश्चित करणे. 
 19. तैनात असणे - नेमणुकीवर असणे. 
 20. रौद्र रूप - भयंकर,

शब्दार्थ | Marathi translation of शब्दार्थ


 1. अक्राळ-विक्राळ रूप.
 2.  जिवाची बाजी लावणे - जीव धोक्यात घालणे. 
 3. जिवाचा आकांत करणे - खूप प्रयत्न करणे. 
 4. निकराचा प्रयत्न करणे - कसोशीने प्रयत्न करणे. 
 5. दुजा - दुसरा. 
 6. कनक - सोने.
 7.  भूषणे - दागिने, अलंकार. 
 8. अनुकूळ - अनुकूल. 
 9. चिंतित फळ- मनात ठरवलेले फळ.
 10.  भजणे - चिंतन करणे. 
 11. वाकबगार - तरबेज. 
 12. कोड्यात टाकणे - पेचात टाकणे. 
 13. कंठस्थ - तोंडपाठ.
 14.  धादांत - पूर्णपणे.
 15. बोचका - गाठोडे.
 16.  जीर्ण - खूप जुना. 
 17. स्मृती - आठवण.
 18. कारवी - वनस्पतीचे नाव. 
 19. मेढी - आखूड खांब. 
 20. वासा- घराच्या आढ्यापासून वळचणीपर्यंत जोडलेला लाकडी दांडा.

मराठी शब्दाचा अर्थ सांगा

 1.  माची - चार पायांची उंच टेबलासारखी. 
 2. राप - काळा थर. 
 3. शिंके (शिंकाळे) - वस्तूसुरक्षित राहावी म्हणून ती उंचावर टांगून ठेवण्यासाठी काथ्याच्या
 4. साहाय्याने तयार केलेले साधन.
 5.  ग्लानी येणे - मरगळ येणे. 
 6. अठरा विश्वे दारिद्र्य- म्हणजेच कायम गरिबी.
 7.  पांगणे - विखुरणे. 
 8. वर्दी- निरोप. 
 9. खाईत पडणे - संकटात पडणे. 
 10. गळवट -काठोकाठ, गळ्यापर्यंत. 
 11. सुजल - भरपूर पाणी असलेले. 
 12. सुफल - फळांनी समृद्ध.
 13.  सस्यश्यामल - पिकांनी हिरवीगार झालेली जमीन.
 14.  मनावर मळभ येणे- निरुत्साह वाटणे. 
 15. डिक्शा - कोवळे देठ. 
 16. सादृश्य - साम्य.
 17. भांबावून जाणे - गोंधळून जाणे.
 18. उकल होणे - उलगडा होणे.
 19.  रगात - रक्त.
 20.  ताट - ज्वारी/बाजरी यांचा धांडा. 

मराठी शब्दकोश - मराठीमाती


 1. आळाशी - कडब्याची पेंढी. 
 2. आळा - कडब्याची ताटं एकत्र बांधण्यासाठी ओल्या ताटांची एकत्र केलेली दोरी. 
 3. उलूशी - लहानशी.
 4.  संरचना - ठेवण.
 5.  नजाकतदार - सुबक.
 6.  अधिवास - वस्ती.
 7. भगणे- तुटणे, मोडणे.  
 8. निसर्गनारायण- निसर्गरूपी देव. 
 9. तगणे- टिकणे. 
 10. क्षीण होणे - कमकुवत होणे. 
 11. सुकाणू - नौका वळवता यावी यासाठी तिच्या मागच्या बाजूस पाण्यात असलेले साधन. 
 12. शीड - वारा अडवण्यासाठी नौकेवरती बांधलेले कापड.
 13.  अग्रणी- सर्वांत पुढे. 
 14. गतकर्म - भूतकाळात केली गेलेली कामे.
 15. पांग फेडणे - उतराई होणे.
 16.  ललाटरेषा - भाग्यरेषा. 
 17.  यत्न - प्रयत्न.
 18.  गौरव - सन्मान. 
 19. दाविती- दाखवतात.
 20.  जाणा - जाणून घ्या.
Kuva शब्दार्थ मराठी - (अर्थ ,शब्दकोश )

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)