श्री दत्त महाराज - श्री दत्तात्रेयांची अष्टके

Information world
0

॥श्री दत्तात्रेयांची अष्टके।

श्री दत्त महाराज


* श्री दत्तात्रेय अष्टक
या अष्टकाच्या सतत पठणाने मनातील इच्छापूर्ती होते.
दीनवत्सला दत्तस्वामिया । धाव संकटी आणुनी दया।
वारी दैन्य हे अन्य यातना । धीपुरस्थित अत्रिनंदना ।।१।।
योगायोग ते नाकळे मला । यामुळे सदां प्रार्थिलो तुला ।।
देऊ तूं नको दुष्ट वासना । धीपुर ।।२।।

मायबाप श्रीपाद गुरूयती । तूचि अससी सांगू हे किती।।
तारी माझी तूं ऐक प्रार्थना । धीपुर ।।३।।
संसृती महापाश हा असे । सौख्य मानसी काही बा नसे ।।
तोडी बन्ध हा बोधी मन्मना । धीपुर ।।४।। 

कामधेनु तू देसी संपदा । कल्पवृक्ष तू वारि आपदा ।।
वेदवाणी ती नाकळे गुणा । धीपुर ।।५।।
दीनबांधवा धाव माऊली । तूचि संकटी योग्य साऊली ।।
पूर्ण बा करी सर्व कामना । धीपुर ।।६।।

भो दयानिधे कल्पपादपा । मालुजी नृपा केलीसे कृपा ।।
वित्त दीधले त्या अकिंचना । धीपुर ।।७।।
कीर्ती वर्णिता शेष भागला । काय वर्णवे तें गुरू मला।
स्वामी राजसा देई दर्शना । धीपुर ।।८।।

नित्य पाठ या अष्टका करी । वांछितार्थ हो प्राप्त सत्वरी ।।
कृष्ण बाळका रक्षि वामना ।।धीपुर ।।९।।

* अष्टक दत्तात्रेयांचे -  श्री दत्त महाराज 

श्री दत्त महाराज


श्री दत्तकृपेसाठी अष्टक
श्री वक्रतुंड चतुरानन बालिकाही । श्री लक्ष्मी भगवती महाकालिकाही।
गीता वसंततिलकामृततुल्य वृत्त । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेव दत्त ।।१।।
सिंहाद्रि पर्यंत महाभुवनप्रकोटी। इंद्रादि देव वसती तेहतीस कोटी ।।
गंधर्व, यक्षगण, किन्नर ब्रह्मभूत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेव दत्त ।।२।।

श्री रेणुका, अनसूया, श्रुति वेदधात्री । गाधी, कपिलमुनि, भार्गवराम, अत्री ।।
ध्याती समग्र सरिता नवकोटी तीर्थ । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेव दत्त ।।३।।
श्रीव्यास, वाल्मीक, शुकादिक नारदाही । वाटे तरीच भवसागरपारदा ही।
भूकोटि मूळ पिठिकाहि सर्वो पसंत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेव दत्त ।।४।।

कल्पद्रुमा हिणवुनी तरु डोलताती । पक्षी विविध स्वर मंजूळ बोलताती ।।
अखंड नाम पठणी करिती आवृत्त । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेव दत्त ।।५।।
जंबूक, व्याघ्र, हरणे, फिरती समोर । चंडोल, कोकिल, करंडक, हंस, मोर ।।
त्या रम्य काननि सदा रव कानी येत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेव दत्त ।।६।।

त्राता दिगंबर अगोचर सूर्य, चंद्रा । माता पुरी करी तृणासनि योगनिद्रा ।।
दाता दयार्णव कदापि नव्हे अदत्त । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेव दत्त ।।७।।
जेव्हा वसंत ऋतु यामिनि शुक्लपक्षी । नक्षत्रराजसुख लक्षि चकोर पक्षी ।।
तेव्हा कधी म्हणिन त्या बसुनी वनात । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेव दत्त ।।८।।

आनंदसिंधु शशिबंधु उदारखाणी । कौपीन, कुंडल, कमंडलू, दंडपाणी ।।
माळा, जटा, मुकुटमंडित अवधूत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेव दत्त ।।९।।
होतील प्राप्त म्हणती मुनी ब्रह्मचारी | धर्मार्थ काम मोक्षादिक लाभ चारी ।।
उच्चारिताच वदनी संसारसक्त । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेव दत्त ।।१०।।

द्यावी सुभक्ति भजनी म्हणे विष्णुदास । आशा धरून इतकी बसलो उदास ।।
केव्हा कृपा करूनी हा पुरवील हेत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेव दत्त ।।११।।

* गुरू पादुकाष्टक  श्री दत्त महाराज 

श्री दत्तकृपेसाठी अष्टक
ज्या संगतीनेच विराग झाला ।। मनोदरीचाच जडभास गेला ।।
साक्षात्परात्मा मज भेटवीला ।। विसरू कसा मी गुरू पादुकाला ।।१।।
सद्योगपंथे घरिं आणियेले ।। अंगेचि मातें परब्रह्म केलें।
प्रचंड तो बोधरवी उदेला । विसरू कसा मी गुरू पादुकाला ॥२॥

चराचरी व्यापकता जयाची। अखंड भेटी मजला तयाची।
परंपदी संगम पूर्ण झाला ।। विसरू कसा मी गुरू पादुकाला ।।३।।
जो सर्वदा गुप्त जनात वागे । प्रसन्न भक्ता निजबोध सांगे ।।
सभ्दक्तिभावाकरितां भुकेला । विसरू कसा मी गुरू पादुकाला।।४।।

अनंत माझे अपराध कोटी ।। नाणीं मनीं घालुनि सर्व पोटी ।।
प्रबोध करितां श्रम फार झाला ।। विसरू कसा मी गुरू पादुकाला ।।५।।
काही मला सेवनही न झाले ।। तथापि तेणें मज उद्धरिले ।।
आता तरी अर्पिन प्राण त्याला ।। विसरू कसा मी गुरू पादुकाला ।।६।।

माझा अहंभाव असे शरीरीं ।। तथापि तो सद्गुरू अंगीकारी ।।
नाही मनीं अल्प विकार ज्याला ।। विसरू कसा मी गुरू पादुकाला ।।७।।
आतां कसा मी उपकार फेडूं ।। हा देही ओवाळूनी दूर सोड ।।
म्यां एकभावे प्रणिपात केला ।। विसरू कसा मी गुरू पादुकाला ।।८।।

जया वानितां वानितां वेदवाणी ।। म्हणे नेति नेति लाजे दुरूनी ।।
नव्हें अंत ना पार ज्याच्या रूपाला । विसरू कसा मी गुरू पादुकाला ।।९।।
जो साधूच्या अंकित जीव झाला ।। त्याचा असे भार निरंजनाला ।।
नारायणाचा भ्रम दूर केला ।। विसरू कसा मी गुरू पादुकाला ।।१०।।

• श्रीगुरुदत्तात्रेयाष्टक - श्री दत्त महाराज 

श्री दत्तकृपेसाठी अष्टक
तापत्रयानें मम देह तापला । विश्रांति कोणी न च देतसे मला ।
दैवें तुझें हे पद लाधलें मला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ।।१।।
कामादि षडवैरि सदैव पीडिती । दुर्वासना अंग सदैव ताडिती ।
त्राता दुजा कोण न भेटला मला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ।।२।।

देही अहंता जडली न मोडवे । गृहात्मजस्त्रीममता न सोडवे ।।
त्रितापदावानळ पोळितो मला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ।।३।।
अंगीं उठे हा अविचार दुर्धर । तो आमुचे हे बुडवीतसे घर ।।
पापें करोनि जाळितो त्वरें मला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ।।४।।

तूंचि कृपासागर मायबाप तूं । तूं विश्वहेतू हरि पापताप तूं ।।
न तूजवांचूनि दयाळू पाहिला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ।।५।।
दारिद्मदावें द्विज पोळतां तया । श्री द्यावया तोडीसि वेल चिन्मया ।।
तया परि पाही दयार्द्र तूं मला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ।।६।।

प्रेतासि तूं वाचविसी दयाघना । काष्टासी तूं पल्लव आणिसी मना ।
हे आठवी मी तरि जीव कोमला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ।।७।।
ह्या अष्टके जे स्तविती तयावरी । कृपा करी हात धरी तया शिरीं ।
साष्टांग घालूं प्रणिपात बा तुला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ।।८।।


।। इति श्री. पु. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीगुरुदत्तात्रेयाष्टकं संपूर्णम् ।।



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)