शब्दांच्या जाती व त्यांचे प्रकार | मराठी व्याकरण
१) विकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.
१) नाम: (संज्ञा )व्यक्ती ,वस्तु,स्थान,पदार्थ ,जागा,
- व्यक्ती वाचक संज्ञा :सीताराम,गोपाल.
- जातीवाचक संज्ञा :गाव,नदी.
- भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य.
- समूह वाचक संज्ञा :भीड,संघ .
- द्रव्य वाचक संज्ञा :पाणी,सोना
२) सर्वनाम : नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी
- पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.
- निश्चय वाचक सर्वनाम : हे ,ते,त्या,
- अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.
- संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे .
- प्रश्न वाचक सर्वनामे :का ?काय?कोठे ?कोण ?कोणाला ? कोणाचा ? कोणता ? केंव्हा ? किती ?
३) विशेषण : नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .
- गुण वाचक विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .
- संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.
- परिणामवाचक विशेषण :चांगला परिणाम ,वाईट परिणाम .
- संकेत वाचक विशेषण :हे ,ते .
४) क्रियापद : एखादी क्रिया घडणे .
- सकर्मक क्रियापद :पाहणे ,खेळणे .
- अकर्मक क्रियापद : हसणे ,रडणे.धावणे,
- संयुक्त क्रियापद :आहे, होता, असेल .
अविकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग , वचन, यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द म्हणतात.
१.क्रियाविशेषण : क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .
- स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .
- कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .
- परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.
- रितीवाचक क्रियाविशेषण : अचानक,हळूहळू ,जोरात .
२) शब्दयोगी अव्यव : नामाला व सर्वनामाला अर्थ बोध होण्यासाठी जोडून येणारा शब्द .स,ला,ना,ते ,आत ,बाहेत,जवळ,पुढे .
३) उभयान्वयी अव्यय : दोन किंवा तीन वाक्य एकत्र करणारा शब्द .आणि ,पण,परंतु, किंवा .
४) केवळ प्रयोगी अव्यय : आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द . वाह !, अरे !, छट !
शब्दांच्या जाती
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मराठी व्याकरण या घटकामध्ये शब्दांच्या जाती व त्यांचे प्रकार या घटकावर हमखास दोन ते तीन प्रश्न परीक्षेमध्ये विचारल्या जातात. या प्रश्नांची तयारी करण्यासाठी शब्दांच्या जाती व त्यांचे प्रकार यांचा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे
शब्दांच्या मुख्यतः दोन जाती असतात.
- हर्षदर्शक – वाहवा, अहाहा, वा वाः अहा, आहो.
- शोकदर्शक – अरेरे, अगाई, हायहाय, शिवशिव, रामराम, देवा रे, आई आई.
- आश्चर्यदर्शक – अबब, अरे बापरे, अय्या, अगवाई.
- विरोधदर्शक – छे, हट्ट, अंहं, उहूं, छी, छी छी.
- तिरस्कारदर्शक – छी, थू, शी, इश्क, अहाहा.
- प्रशंसादर्शक – वाहवा, शाबास, भले, ठीक.
- स्वीकारदर्शक (संमतीदर्शक) -जी, हां. ठीक. वरे, होय.
- संवोधनदर्शक – अरे, अहो, अग, ए, रे.
शब्दांच्या जाती – क्रियापद
क्रियापद – क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. क्रियेचा काळ आणि विशेष अर्थ यांचा पूर्ण बोध होतो. तसेच ह्याक्रियावाचक शब्दामुळे वाक्ये पुरी होतात. म्हणून ह्या विकारी शब्दास क्रियापद असे म्हणतात.
क्रियापदाचे एकूण सहा प्रकार आहेत –
- (अ) सकर्मक क्रियापद
- (ब) अकर्मक क्रियापद
- (क) संयुक्त क्रियापद
- (ड) सहाय्यक क्रियापद
- (ई) प्रयोजक क्रियापद
- (फ) शक्य क्रियापद
(अ) सकर्मक क्रियापद –
ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरूरी असते, त्यास सकर्मक क्रियापद म्हणतात.
उदा : रामू भाजी विकतो
स्पष्टीकरण : विकणारा कोण ? रामू. म्हणून रामू हा कर्ता. विकण्याची क्रिया कोणावर घडते ? भाजी या शब्दावर, म्हणून भाजी हे कर्म, रामू विकतो या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्याला पूर्ण होण्यास ‘भाजी‘ या कर्माची जरूरी आहे. म्हणून ‘विकतो‘ हे सकर्मक क्रियापद आहे.
ब) अकर्मक क्रियापद –
ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरूरी नसते, त्यास अकर्मक क्रियापद म्हणतात.
(क) संयुक्त क्रियापद – कधी कधी क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रिया दर्शविणाऱ्या रुपाला जोडून दुसऱ्या क्रियापदाचा उपयोग करावा लागतो. या दोन्ही क्रियापदांच्या संयोगाने जे क्रियापद तयार होते त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात.
(ड) सहायक क्रियापद –
तसेच त्या मुख्य क्रिया दर्शविणाऱ्या रुपाला जोडून जे दुसरे क्रियापद येते, त्याला सहायक क्रियापद किंवा सहायकारी क्रियापद म्हणतात. मुख्य क्रिया दर्शविणारे रूप + सहायक क्रियापद = संयुक्त क्रियापदसव्यय / विकरण / विकारी = बदलणारा
*अव्यय / अविकरण / अविकारी = न बदलणारा
सव्यय:- नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या चार जातीत लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होतो. त्याला विकारी / विकरण / सव्यय असे म्हणतात
पुरुष
- प्रथम —पुरुष—— मी – आम्ही
- द्वितीय —पुरुष —-तु – तुम्ही
- तृतीय —-पुरुष—- तो , ती, ते,
त्याक्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवलप्रयोगी यांच्या रुपात लिंग, वचन, पुरुष याच्यामुळे बदल होत नाही त्यास अविकारी / अविकरण/ अव्यय असे म्हणतात.
1)क्रियाविशेषण अव्यय
- घोडा– जलद–धावतो
- कर्ता– क्रियाविशेषण–क्रियापद
लिंग
- स्त्रीः- घोडी जलद धावते
- पु.:-घोडा जलद घावतो
- न.पु.:- घोडे जलद धावतात
वचन
- ए.व.:- मुलगा जलद धावतो
- अनेकः- मुले जलद धावतात.
2) शब्दयोगी अव्यय
- पु.:- घोडा झाडाखाली बसतो.
- स्त्री:- घोडी झाडाखाली बसते
- न.पुः- घोडे झाडाखाली बसतात
- एकः- घोडा झाडाखाली बसतो
- अनेकः- घोडे झाडाखाली बसतातवरील
उदाहरणात लिंग वचन पुरुष यामुळे बदल झालेला दिसत नाही म्हणून त्याला अव्यय म्हणतात